Marathi Mandal Sacramento

मराठी पाऊल पडते पुढे

Ganapati 2009

गणपती बाप्पा मोरया!!! मराठी मंडळाची गणपती उत्सव साजरी करण्याची ही जरी पहीली वेळ असली तरी मंडळातील उपस्थित सभासदांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह फारच दांडगा होता. पूर्वी दरवर्षी ज्यांच्या घरी गणपतीची पुजा केली जायची त्यांच्याकड़े आरती करण्यास मंडळातील सदस्य जात असत. परंतु ह्या वर्षी सर्वांनी एकत्र येऊन गणेशपूजा आणि आरती करावी असे ठरवण्यात आले. सर्वानी वेगवेगळा प्रसादाचा शिरा आणने ही कल्पना जरी आगळी वेगळी वाटली तरी ती प्रत्यक्षात साकार झाल्यानंतर फारच सुंदर वाटली. प्रसादाचा गोड शिरा तर सर्वाना आवडतो पण एकच प्रसादाचा शिरा वेगवेगळया पद्धतीने बनवून आणल्यामुळे त्याचा गोडवा आणखी वाढला. अथर्वशीर्ष आणि आरत्या करताना मंगलमुर्तीला प्रत्येक कुटुंबाने केलेली ओवळणी व त्या एकत्र आरती करण्यातील भावुकता, मंदीरातील प्रसन्न वातावरणात चटया अंथरून त्यावर बैठक करून केलेल्या त्या मनमोकळ्या गप्पा, नवीन सभासदांची ओळख व जुन्या सभासदांची आणि कार्यकर्त्यांची आतापर्यंतची कारकीर्द आणि पुढील उपक्रमाबद्दल तोंडओळख सर्व कसे वातावरणातील उत्साह द्विगुणीत करीत होते. अशा रितीने अगदी सोप्या पद्धतीने गणेश ऊत्सवाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. गणरायाच्या कॄपेने अशाचप्रकारे सर्वानी एकत्र येऊन पूढील वर्षी गणरायाचे आगमन आणि त्याचे जोरदार स्वागत करण्याची सर्वाना आतुरता असेल. गणपती बाप्पा मोरया, पूढच्या वर्षी लवकर या!!!