Abhiruchi
नमस्कार मंडळी!
या वर्षीच्या अभिरुची मासिकाच्या संपादकपदाची धुरा मंडळातील काहीजिवलग सदस्यांनी प्रेमानं माझ्या हाती दिली, आणि मीही ती आनंदानंस्वीकारली. मराठी संस्कृती, कला, कविता आणि साहित्य लेखनाची आवडअसल्यामुळे ही भूमिका निभावण्यासाठी मला खूप उत्साह आला आहे. अभिरुचीच्या प्रत्येक अंकाची मांडणी सुसंगत, विषयानुरूप आणि वाचकांनामनापासून भावेल अशी करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. पण आपलंअभिरुची मासिक मनोरंजक आणि चित्तवेधक बनवण्यासाठी मला तुमच्यासर्वांच्या सहकार्याची खूप गरज आहे, नुसत्या पालकांचीच नाही, तर तुमच्यामुलांची, आजी आजोबांची, तसेच भेट देणाऱ्या मित्र मैत्रिणी आणिनातेवाईकांचीदेखील. तुम्ही पाठवलेले लेख, निबंध, कविता, शब्दकोडी, विनोद, आणि चित्रकला या सर्वाना घेऊन आपण या अंकाला आकर्षक बनवूशकू. लहानग्यांच्या रंगतदार कल्पना, आजी आजोबांच्या गोड आठवणी, आणि तुमच्या सगळ्यांच्या कल्पनाशक्तीची उधळण अभिरुचीला नक्कीचमनोरंजक बनवेल. चला तर, या वर्षीचा अभिरुची अंक आपल्या सगळ्यांनीमिळून रंगवूया!
स्मिता कुलकर्णी
Past Magazines
Drop Us a Line
Reach out to us from our contact form and we will get back to you shortly.